छान वर्णन केले आहे.
एकीकडे 'मॅक्डी' आणि तत्सम महागड्या हाटेलामध्ये पैसे उधळणारे लोक आणि दूसरीकडे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी बांधव , किती विषमता आहे.
इतके दिवस IT मध्ये असून तू इतका कसा रे बॅकवर्ड?
गेली ९ वर्षे मी IT मध्ये असून कधीच 'मॅक्डी' आणि तत्सम महागड्या हाटेलामध्ये गेलो नाही. सुरूवातीला परवडत नव्हते म्हणून आणि आता परवडत असले तरी ते पैसे वाचवून मला एखाद्या गरीब , होतकरू विद्यार्थ्याला द्यायला आवडेल. त्यामुळेच गेले ८ महीने onsite ला एकटाच राहत असतानाही मी 'मॅक्डी' , 'पिझ्झा हट' टाळतोय. तात्पर्य : मला कायम बॅकवर्ड राहायला आवडेल. :-)
जाता जाता : ते वाढदिवसाला केक कापल्यावर तो केक तोंडाला फासण्यामागील गूढ काय आहे , कोणी सांगू शकेल काय?