तसे मला फारसे नीट सांगता येइल असे वाटत नाही पण जसे जमेल तसे सांगते
त्यांनी भूतकाळाचा शोध घ्यायला का सुरुवात केली हे मला आठवत नाही नीटसे पण कुणीतरी सांगीतले की तुम्हाला नाडी ग्रंथ भविष्याचा उपयोग होइल म्हणून ते तिकडे गेले.... त्या व्यक्तीला विचारले की मला माझ्या भूतकाळाची माहीती करून घ्यायची आहे आणि ह्या प्रकारात ती कळू शकते हे खरे आहे का?
त्या व्यक्तीने त्यांना सांगीतले की कर्नाटकातल्या ह्या गावात क्षक्षक्ष साली तुमचा म्रुत्यू झाला.... त्या जन्मात तुम्ही ह्या ठिकाणी शंकराच्या देवळातले पुजारी होतात. तुम्ही लग्न लावून देण्याचे काम करीत असत आणि स्वार्थासाठी तुम्ही चुकीच्या (कदाचीत कुंडली न जुळलेली असेल) लोकांची लग्ने लावून दिलित. तुमच्या भावांची क्षक्षक्षक्ष एकर (त्यांनी भिगा म्हंटले ... आता दो भिगा जमीन हे सिनेमाचे नाव आहे ह्या व्यतिरिक्त मला काहीही माहीत नाही की भिगा म्हणजे नक्की किती जमिन) जमीन लुबाडलीत..... मग त्यांचे तळतळाट तुम्हाला लागले..... असे काहीसे झाले....
ह्याचा शोध घ्यायचा असे त्यांनी ठरवले.... योगायोग फक्त एवढाच होता... कि त्या पुजाय्रांचा म्रुत्यू ज्या वर्षी झाला त्याच वर्षी २ महिन्याच्या फरकाने नहार ह्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी ह्याचा सगळ्याचा पडताळा करायला कर्नाटकात असे गाव आहे का तिथे शंकराचे मंदिर आहे का? असेल तर त्याचे कुणी जुने पुजारी आहेत का ज्यांच्याकडून ही माहीती मिळेल..... त्यांनी सांगीतले की ह्याबद्दल माहीती असलेले पुजारी मिळेनात..... पण अचानक त्यांनाच असे आठवले की एक पोलियो झालेले व्रुद्ध शास्त्री ह्या गावात आहेत...(हे आपल्याला कसे आठवले??? आपण तर इथे कधीही आलो नाही असा विचार त्यांच्या मनात आला असे ते म्हणाले.) मग त्या शास्त्रींना शोधून त्यांनी सगळी माहीती विचारली .... ति तंतोतंत खरी निघाली..... आणि असे कळले की हे जे गेल्या जन्मातले पुजारी आहेत ते ह्या शास्त्रींचे काका होते. मग शास्रींनी त्यांना विचारले की तुम्हाला हे सगळे कसे कळले..... तेव्हा नहार ह्यांनी सांगीतले....
"तुमचा तो काका म्हणजे गेल्या जन्मातला मीच आहे......"