मग मॅक्डी मध्ये जाऊन खाणे आणि त्यात धन्यता मानणे याला फिरंगीपण का मानावे - माझ्या मते अमेरिका वा तत्सम देशात मॅक्डी मध्ये जाणे हे अगदी सामान्य आहे

अमेरिकेत बहुधा विद्यार्थी आणि गरिब लोक  मॅक्डोनाल्डस मध्ये जातात. मी खूप आधी एकदा मॅक्डोनाल्डस मध्ये गेलो होतो आणि बील (५ डॉलर) कंपनीत सुपुर्त केले तेव्हा बॉस बोलाउन म्हणाला कि "परत मॅक्डोनाल्डस चे बील पास करणार नाहि. जेवायला चांगल्या ठिकाणी जात जा, आणि बील याच्या ३ पट तरी आले पाहिजे. नाहीतर मला माझ्या बॉस ला उत्तर द्यावे लागेल."

पण माझा एक चिनी मित्र एकदा म्हणाला कि चीन मध्ये सुद्धा मॅक्डोनाल्डस खुप महाग आहे. मुलाचा हट्ट पुरवण्या साठि पालक मॅक्डोनाल्डस मध्ये जातात, पण स्वतः काही न खाता मुलाला खाउ घलतात.