>>आणि तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे ज्यांचं म्हणणं आपल्याला पटत नाही त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? पण असा विचार तुम्ही केलेला नसावा.<<

केवळ तुमचं पटलं नाही म्हणून तुम्ही 'नीट न वाचता बोलणे', 'विचार न करणे' इत्यादी पद्धतीने खडे फोडत आहात हे कशासाठी. जेव्हा इथे लिहिलंयत तेव्हा त्यावर पटलं किंवा नाही पटलं हे म्हणायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. प्रत्येकाचं मत आहे ते आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचं नसेल हो पण तरी ते इथे नोंदवायचा अधिकार सगळ्यांना आहे. तेव्हा नाही पटलं ते नाही पटलं असं म्हणण्यात आमची कुणाचीही काहीही चूक नाही. आम्ही कोणीच आमचं मत बरोबरच माना असला सूर लावत नाही आहोत. आम्हाला असं वाटतं एवढंच लिहिलंय. तेव्हा आमचं मत अजिबात पटलं नाही एवढं म्हणा ते पुरे आहे की. आम्ही न वाचता बोलतोय, आम्ही अमुक असा विचार करत नाही इत्यादी पद्धतीने वैयक्तिक पातळीवर उतरायची गरज नाही.

असोच!