प्रिय चित्त,
आम्ही काही नवकवितेचे नवयुग आणण्यास समर्थ नाही. तो प्रकार नवकवीच करू जाणेत. अर्थात आपल्या अभिनंदनाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आम्ही निश्चितच आभार मानतो. (खरेतर इथेच आम्ही नवकवी नसल्याचा पुरावा मिळतो. सच्च्या नवकवीने आभारप्रदर्शन काव्यात्मक केले असते. अर्थात, माझ्या आभारातसुद्धा थोडेसे गद्य-नवकाव्य सापडायला हरकत नाही.)
असो.
माझे नाव चैत्रचैत नसून चैत्रेचैत (वास्तविक, चैत रे चैत) आहे. जुना पिक्चर आठवतोय का? जैत रे जैत?

(विषयातील 'प्र:' म्हणजे प्रतिसाद हे आपल्याला कळले असेलच!)