मला ही कविता फारच आवडली.
भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही
या ओळी तर अप्रतिमच आहेत. नुकत्याच वाचत असलेल्या मो. रा. गुण्येंच्या अमित आनंदाचे विश्व या पुस्तकातील आशय आणि तुमच्या या ओळींतून व्यक्त होणारा खेद एकत्र जुळून आल्यामुळे अधिक भावला. फुलपाखरू बनून स्वतःच्या व्याप्तीच्या आनंदात समरसून भरारी घेण्याऐवजी आपण आपलं अस्तित्व संकुचित करून किड्याप्रमाणे जगणं पसंद करतो ही मानवी आयुष्याची शोकांतिका.
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
सुरेख!!!