अहो, आपण सगळे भारतीय आहोत. बरोबर आहे. ते भारतातर्फे खेळ करतो तेव्हा ते खुप महत्त्वाचे आहे. ते खरेही आहे.

पण, जेव्हा भारतातल्याच एका प्रदेशातील लोक भारतातल्याच दुसऱ्या प्रदेशात जावून, त्या प्रदेशातल्या लोकांच्याच अस्तित्वाला, भाषेला आणि नोकऱ्यांना ( आणि आता राजकारणातही शिरून सत्ता गाजवायचा प्रयत्न करून, सत्तेलासुद्धा ) धोका निर्माण करत असतील तर, त्या दुसऱ्या प्रदेशातील लोकांना फक्त 'भारतीय आहेत' म्हणून विरोध करायचा नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? आणि मग या अस्तित्त्वाला धोका निर्माण झालेल्या प्रदेशातील भारतीय? ते कुठे जातील? तेही भारतीयच आहेत ना?

मग भाषावार प्रांतरचना का केली गेली?

एकाच आई वडीलांचे दोन मुलं असतील, दोन्ही स्वभावाने आणि इतर बाबतीत सारखे असतील,पण एकच मुलगा वडिलांची सगळी संपत्ती हिसकावून घेत असेल तर चालेल का?