मोल्सवर्थच्या शब्दकोशात कुजबुज असे लिहिलेले आहे.

शुद्धिचिकित्सकात कुजबुज असे नाम नव्हते. कुजबुजणे असे क्रियापद होते. त्याचे आज्ञार्थ एकवचनी रूप 'कुजबूज' असे झाल्याने शुद्धिचिकित्सक तेच रूप योग्य मानत होता. (उदा. उठणे - ऊठ, कुटणे - कूट)

आता शुद्धिचिकित्सकात (मोल्सवर्थला अनुसरून) कुजुबुज हे नाम घातलेले आहे. (शुद्धिचिकित्सक वितरित विदागारातून काम करत असल्याने सर्व विदागारांमध्ये हा बदल व्हायला अद्याप काही अडचणी आहेत.)

एक शंका : सुजणे चे नाम सूज होते तसे कुजबुजणे चे नाम कुजबूज का होऊ नये? उच्चारानुसारही कुजबूज हे योग्य वाटते. तज्ज्ञांनी खुलासा करावा.

मिलिंद फणसे ह्यांना पाठपुराव्याबद्दल धन्यवाद.