केवळ मोल्सवर्थमध्येच 'कुजबुज' नाही तर इतरही काही शब्दकोशांमध्ये तसेच दिलेले आहे. माझ्याक्डील नवनीत मराठी-इंग्रजी- मराठी शब्दकोशातही (प्रथमावृत्ती २००५-६ . हा शब्दकोश नव्या शुद्धलेखन नियमांनुसार आहे.)
कुजबुज n. fem. whispering. हळूहळू बोलणे, कुणकुण.
असे दिले आहे. तसेच श्रीधर गणेश वझे यांच्या आर्यभूषण शालेय शब्दकोशातही "कुजबुज" असेच आहे. इथे पहा. इतर सदस्यांनी आपल्याकडील अन्य शब्दकोशात कोणते रूप दिले आहे ते कळवावे.
'कुणकुण' या शब्दातही कुजबुजप्रमाणे दोन्ही 'कु' हृस्व असतात असे दिसते.

उच्चारानुसारही कुजबूज हे योग्य वाटते.
    - बोलताना 'कुजबुज' असाच सहसा उच्चार केला जातो ना? यात 'बु'चा उच्चार दीर्घ (बू) ऐकल्याचे आठवत नाही. 'कुजबूऽज' काही कानास बरोबर वाटत नाही.