इतर सदस्यांनी आपल्याकडील अन्य शब्दकोशात कोणते रूप दिले आहे ते कळवावे.
सवाल नव्या नियमांचा आहे. शब्दकोशांचा नाही. त्यामुळे सदस्यांकडील शब्दकोश नव्या नियमांनुसार लिहिले आहेत की नाही, हेदेखील बघावे लागेल. नव्या नियमांमुळे बराच गोंधळ उडतो आहे खरा. पण आता सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आदी वृत्तपत्रांनी हे नियम पाळायला सुरुवात केली आहे, असे वाटते. असे असले तरी कवितेत कुजबूज लिहिले काय किंवा कुजबुज लिहिले काय!