या शब्दांचा अर्थ काय? माडगूळकरांच्या वावटळ मध्ये खालील उतारा आहे.
लोक आले आले म्हणतांच, खालच्या आळीच्या भुजंगाने पैसाअडका भरलेली कासंडी हातीं घेतली आणि दम्याने वाकलेला तो जरत्कारू माणूस ओढ्याकडे पळाला. धांदलीने त्याने ती कासंडी ओढ्यापलीकडे असलेल्या लोहाराच्या शेतात खड्डा खणून पुरली. खुणेसाठी वर दगड ठेवला आणि तो घराकडे परत आला. तोवर इकडे घर जळले होतेंच. सामानसुमान लुटले होतेंच. सगळे नाहीसे झाले तरी पैक्याची कासंडी सुखरूप होती. ह्या बळावर भुजंगाने पेटते घर पाहिले.
जरत्कारू म्हणजे बहुधा अतिशय कृश माणूस किंवा कृपण असा अर्थ असावा. ऋषीचं नाव आहे का हे?
आणि कासंडी दिसायला कशी असते?
-सौरभ.