आपले अनुभव काय हव्या त्या उद्देशाने मांडण्याचा जसा तुम्हाला हक्क आहे तसाच त्याबद्दल (तुम्ही लिहिलेल्या आणि मला असमर्थनीय वाटणाऱ्या वर्तणुकीवर) अभिप्राय द्यायचा आम्हाला अधिकार आहे. तुम्हाला पटत नसेल तर राहिलं.
'परंतु सांगीतलेल्या गोष्टी तरी पूर्ण मिळाव्या हि अपेक्षा असणे काहीही वावगे नाही..... ते ही फुकट नाही पूर्ण पैसे भरले आहेत म्हणून'
तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी दिल्या नसतील तर ती कंपनीची चूक. पण टूर पैकेज मध्ये कसले कसले शो आहेत, नाहीत ह्याची चौकशी कोणी करायची? नंतर मग हे कशाला दाखवलं, ते का नाही, ह्या राइड्स फूकट का दिल्या नाहीत वैगेरे खडे फोडणे निरर्थक आहे. इतका जर प्रवासाचा चोखंदळपणा असेल तर एक तर स्वतःच टूर डिजाईन करायची आणि जायचं, नाहीतर राहा मग कम्पनीच्या भरवशावर.
'राहीली गोष्ट उशीर करण्याची...' ह्याला तर काहीच अर्थ नाही. एकीकडे हनीमून हनीमून आराम पाहिजे; दगदग नको; शंभर ठिकाणं कशाला बघायची असं म्हणायचं आणि दुसरीकडे टूर प्लानला second guess करायचं. असं का, तसं का; हे सगळं आधीच माहित करून घ्यायला नको का? की हे प्रश्न तुम्ही नाही विचारले हीही चूक त्यांचीच. मी काही त्यांची वकिली करत नाही पण आधी लिहिल्याप्रमाणे असला extra smart पणा प्रवासाआधी दाखवला तर कामी येईल पुढ्च्यावेळी.
'मी फक्त माझे अनुभव लिहिले.... मी कथाकार नाही की प ला काय वाटते ह्याचा विचार करून लिहीन...'
तुम्हाला 'प' ला काय वाटते ते तिच्या भूमिकेत जावुन त्यावर निबंध लिहायला कोणी सांगितलं नाही व सांगणारही नाही. मी इतकच म्हटलं की असली आणखीन एक 'विचित्र' लेखमाला तिच्याकडून आली असती तर लोकांना आणखी थोडं ज्ञान मिळालं असतं - की सहप्रवाशी विचित्र वाटणारे असले तर कसा प्रवास पूर्ण करायचा.
तुम्हाला जे वाटलं त्यात तुमचा किंवा माझा दोष नाही. प्रत्येकाची आकलनशक्ति वेगळी असते, समजूतदारपणा वेगळा असतो. आणि एकच गोष्ट कोण कशी समजून घेइल हे त्यावर अवलंबून असतं. असो
बाकी माझे वैचारिक डोस तुम्हाला नव्हेत तर सुज्ञ वाचकांना त्या टिप्स आहेत. पुढ्च्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात ना..तुमच्या सहभागाबद्दल आभार!
'मी फक्त एवढेच म्हणेन की अशा हनिमून चा अनुभव तुम्हाला आला असता तर कळले असते'
बरेवाईट अनुभव सगळ्यांनाच येतात. मला आला असता तर मी त्या कंपनीच्या हेड ऑफिसला रीतसर तक्रार करून, (सगळ्या गोष्टींची, नाव, तारीख सकट) त्यांना ग्राहक पंचायत, वकील वगैरे तम्बी देऊन भरपाई मागितली असती (दूसरी टूर तरी). पेपरलाही दिलं असतं छापायाला. तुम्ही केलत का असं काही? एकदा लढायचं तर शेवटपर्यन्त..(पुस्तकी नव्हे बरं का हे..)
फुका आकांडतांडव आणि कान्गावा करून काही साध्य होत नाही, प्रज्ञाताई!