जरत्कारू - क्षीण, दुबळा, रोड, फार अशक्त माणूस
खाली दिलेली माहिती "भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) " [लेखक - म.मो. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव] मधून घेतली आहे.
जरत्कारू -- एक वैदिक सूक्तद्रष्टा (ऋ. १०.७६)
२. एक महान ऊर्ध्वरेतस् ऋषी. हा यायावर नामक ब्राह्मणवंशात जन्मला असून आस्तीक ऋषींचा पिता होता. (म. आ. ४१.१६)
नामव्युत्पत्ती -- 'जरत्कारु'चा शब्दशः अर्थ 'तपाने स्वशरिराला (कारु) क्षीण करणारा' असा होतो (म. आ. ३६.३). यामुळेच 'जरत्कारु'ला 'क्षीण प्रकृतीचा' असा लौकिक अर्थ प्राप्त झाला आहे.