जरत्कारू हे ऋषी वासुकी नागाच्या बहिणीचे पती होते आणि जनमेजयाच्या यज्ञात तक्षकाला वाचवणाऱ्या अस्तिक ऋषींचे पिता होते. अतितपाने त्यांची काया कृश आणि सुरकुतलेली झालेली असली तरी तपाच्या तेजाने त्यांच्यामध्ये तपोबल निर्माण झालेले होते. म्हणून त्यांचे नाव जरत्कारू असे पडले.