संदीप,

खूप सुंदर लिहिले आहेस. मी नुकताच म्हणजे ९ एप्रिलला शिकागो इथे आलो. योगायोग म्हणजे मी पण ९ एप्रिलला नेवार्क येथेच उतरलो आणि तिथून शिकागोला आलो. पुढे-मागे मी पण याबद्दल लिहिणारच आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांगायच्या आहेत माझ्या या अनुभवांबद्दल. तुझा हा लेख वाचून अगदी माझ्या भावना मांडल्यासारखे वाटले. खूप सुंदर लिहिले आहेस. (तुला मी 'तू' म्हणतोय कारण तू २००५ ला अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केलास. आणि मी २००० ला. राग नसावा.) अजून एक साम्य म्हणजे मी पण जळगांव जिल्ह्यातला! बोदवडचा. तुला माहित आहे की नाही हे गांव महित नाही.

तुझ्या या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो. तुझी प्रगती खरचं कौतुकास्पद आहे. अभिनंदन!

--समीर