मला नेहमी ऐकू येते
मनातही जे म्हटले नाही

वा...वा...

मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?

छान...

फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

खूपच छान...

शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही

वा...

तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही
सुंदर...

शुभेच्छा, अनिरुद्ध...गझलांसाठी मनापासून शुभेच्छा.

येऊ दे अजून. येऊ दे आणखी.