ह्या धोरणाचे स्वागत. माझा पाठिंबाही. तरीही त्याला आचरणात आणायला वेळ लागेल असे वाटते. मी मराठी बोलतो, लिहितो पण समोरच्याला मराठी समजणे/वाचता येणे तेवढेच गरजेचे आहे.
ह्या धोरणाविषयी तुम्हाला काय वाटते?
सरकारी धोरण आहे त्यामुळे कितपत चालेल ह्यातच शंका आहे.
जनतेत, उद्योगात आणि इतर क्षेत्रांत ह्याचे स्वागत कसे होईल असे तुम्हाला वाटते?
मराठी उद्योगजगत बहुधा स्वागत करेलही. इतरांचे माहीत नाही.
तुमच्या आयुष्यातल्या कोठल्या गोष्टींवर ह्या धोरणाचा बरावाईट परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? कसा?
सरकारी कामे मराठीत होण्यासाठी मग सर्वांना मराठी येणे गरजेचे आहे. त्याकरीता सर्वांना (कर्मचारी) मराठी शिकणे आले. अन्यथा अरे यहक्या लिखा है ? इसका मतलब क्या है? अशा प्रकारात आधीच होण्याऱ्या कामाच्या दिरंगाईत ह्याचा परिणाम होऊन कामे आणखी हळू न होवोत ही भीती.