काही दिवसांपुर्वी मनोहर जोशी यांनी लोकसभेत प्रश्न विचारून रेल्वे गाड्यांवरचे फलक मराठीत नाहीत असे सांगितले होते. तेंव्हा थोर रेल्वेमंत्री लालू यांनी सांगीतले की गाडी सुटण्याचे आणि गंतव्य स्थान येथील भाषात फलक आहेत (ईग्रजी शिवाय) . दाक्षिणात्य भाषांबद्दल हे अंमलात आलेले  दिसते पण मराठीबाबत सगळे नियम बासनात बांधले जातात. टिळकांचे तिलक होते. बहुतेक स्थानकांवर तर आपण महाराष्ट्रात आहोत हेच समजत नाही. हे झाले रेल्वेचे पण बहुतेक केंद्र सरकारी आणि अशासकीय कार्यालयात हीच  परीस्थिती आहे (बहुतेक ठीकाणी जाणीवपुर्वक) . मुंबईत तर बहुतेक कंपन्याच्या कॉल सेंटर वर मराठी पर्याय उपलब्धच नाही.( उदा. हच ).