बकुळ यांना,
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
अहो, यात कसले आले आहे मौलिक मार्गदर्शन ? हे मार्गदर्शन नाही आणि मौलिक तर त्याहूनही नाही. मार्गदर्शन या शब्दाला मी फार फार घाबरतो. घाबरवू नका मला, कृपया. :) . मी यापूर्वी कुठे कुठे वाचलेली आणि मनात साठवून ठेवलेली थोडीबहुत माहिती आणि डॉ़. माधवराव पटवर्धन यांच्या छंदो(छन्दो)रचना  या अपूर्व ग्रंथातील काही माहिती एकत्रित करून ते संकलन मी इथे सादर केले आहे, एवढेच. आपल्याकडचे ज्ञान तर जाऊच द्या; पण माहितीही इतरांना खुलेपणाने न देण्याचा आजचा हा काळ ! (आणि दिली तरी त्या माहितीच्या महालात मी मी चे आरसे सगळीकडे लावलेले !)
त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला या गोष्टीचे अप्रूप वाटले असल्यास न कळे. हा तुमचा मोठेपणा ! या लेखापुरते बोलायचे झाल्यास इतकेच म्हणता येईल की - मी तो हमाल भारवाही ! (इथला मी मात्र अपरिहार्य हां !)
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.