मात्र, एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून एका नाटकाला शंभर-दीडशे रुपये मोजायला मला परवडत नाही. चित्रपटाच्या तुलनेत तर नाहीच नाही! अशा अवस्थेत नाटक जगायचं कसं? मुळात नाटकाची आवड असलेले प्रेक्षक कमी. जे येतात, त्यांच्याही आवडीनिवडी निराळ्या.
पैसे मोजतो आणि विकत घेतो हा दृष्टिकोन ह्या ठिकाणी योग्य नाही. कलावंतांचाही इतके पैसे टका तर येतो हा दृष्टिकोन योग्य नाही. भपकेबाजपणा योग्य नाही.
नवनवे चांगले होतकरू कलाकार घेऊन ठिकठिकाणी छोट्या रंगमंचावर चांगली नाटके करता येतील. पाहता येतेल. पूर्वी भरत नाट्य मध्ये स्वस्त नाटक योजना होती. ती अजून चालू आहे का? तिच्यात जुनी जुनी नाटके पण नवे होतकरू हौशी कलाकार सादर करत. त्या योजनेचे सभासद असत ती ती पाहत. ती चांगली योजना होती.