आपल्या कॉलनीतल्या सोसायटीतल्या आजूबाजूच्या तरुण तरुणींना एकत्र करून चांगली नाटके बसवावीत आणि एखाद्या छोट्या थिएटरमध्य करावीत. आपल्या नातेवाइकांना अशाच नाटकाला घेऊन जावे. सुरवातीला फालतू होतील. पण हळू हळू प्रगती होईल. व्यावसायिक उंच उडत्या कलाकारांची नाटके पाहण्याऐवजी स्थानिक कलाकारांचीच नाटके पाहावेत. हळू हळू त्याचीच एक प्रकारची फॅशन होईल आणि लोकंना तेच करणे प्रतिष्ठेचीही वाटू लागेल.