मनोगतवर कुणीतरी एक किडा सोडतं आणि फारच चांगले प्रतिसाद येतात... वाचायला गंमत वाटते.
तर... ह्या "ळ" चा बराच घोळ आहे. उत्तर भारतीयांमध्ये "ळ" म्हणजे काय हे माहितच नसते. कन्नडमध्ये "ळ" चा बराच प्रयोग होतो... एक उदाहरण म्हणजे - "हळ्ळी" - ज्याचा अर्थ होतो "गाव", आणि "हल्ली" चा अर्थ होतो "पाल" (ती भिंतीवर चढणारी, बऱ्याचजणांना अकारण घाबरवणारी). तमिळमध्येही "ळ" येतो पण त्याचा उच्चार आपण मराठी भाषिकांनाही करता येत नाही (आणि तरीही आपण आपल्या बाजूने उत्तर भारतीयांना नावं ठेवतो की "ळ" बोलता येत नाही). तमिळ "ळ" मध्ये काहीतरी "ज" चे मिश्रण असते, ते माझ्या काही डोक्यात शिरले नाहीये.
मराठीतले दोन "च", दोन "ज" ही पण बहुतेक खासियत आहे. आणि देवनागरी लिपीचा अपवादही आहे... नाहीतर एकाच लिखित अक्षराचे वेगवेगळे उच्चार होत नाहीत.
फारच पकवलं तुम्हाला... "sadist" ला काही मराठी शब्द असला तर तो लागू होतो मला कधीकधी.
हृषीकेश