आमच्या नातेवाईकांनी सांगितलेली खालील सत्य घटना :
एक नवरा बायको ( यातील बायकोला आपण क म्हणूया )एका गावी एका लग्नाला उपस्थित राहाण्यासाठी गेले. त्या गावी दोघे प्रथमच जात होते. लग्नाच्या आदल्या रात्री सीमांत पूजन असते. ते रात्री उशीरापर्यंत चालते. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास ती स्त्री (क) काहितरी कचरा वगैरे फेकण्यासाठी कार्यालयापासून थोडे दूर एका निर्जन ठिकाणी गेली. आणि जेव्हा परत आली तेव्हा ती झपाटली गेलेली होती आणि वेगळ्याच गोष्टी बडबडायला लागली होती.
" माझे तुम्ही तुकडे केले आणि मी तुम्हाला सोडणार नाही" वगैरे.
नंतर स्थानिक लोकांकडून कळले की त्या जागी एका बापाने मुलीला निर्दयपणे तुकडे करून गाडले होते कारण ती तीच्या मित्रापासून गर्भवती होती.
क ही स्त्री त्या गावी पहिल्यांदा आली होती आणि तीला त्या बापा ने मुलीला मारण्याच्या घटनेबद्दल आधी माहिती नव्हती. मग हा प्रकार मल्टिपल पर्सनॅलिटी चा नक्की नाही. ( अक्षयकुमारच्या'भूल भूलैया' चित्रपटा प्रमाणे )
मग या मागचे कारण काय ?