शर्टात अंग घालणे, म्हणजे हात ई. कशाचाही वापर न करता खुंटी/हँगरला लावून ठेवलेल्या शर्टात खाली वाकून अलगद शिरणे, ही तुमची विनोदी समजूत पाहून मला मात्र खो खो हसू आले! तुमचे अभावित विनोद असेच सुखाने घडत राहोत!

मला या दुटप्पी धोरणाची खरोखरच गंमत वाटते. सरळ सरळ चुकीचे असलेले प्रयोग 'खुमासदार भाषा', 'भाषेची गोडी' ई. नावाखाली स्वीकारायचे, पण त्याचबरोबर 'ण' चा 'न' झाला की फना/णा काढायचा. तुम्हाला हा धेडगुजरीपणा खटकतो, पण 'मला माझ्या मित्राने हाक मारल्यावर मी पायात चपला घातल्या आणि त्याला भेटायला खाली गेलो' या वाक्यातील धेडगुजरीपणा खटकत नाही ?
या वरणभातात तुम्हाला खडा लागत नाही ?  हे वाक्य तुम्हाला दाढेत जीवघेणी कळ आणणारे, क्लेशकारक ई.ई. वाटत नाही ? कमाल आहे! तुमच्या 'selective perception' ला दाद दिली पाहीजे!

जे लोक शतकानुशतके बोलीभाषा वापरत आहेत, ते जर म्हणाले की काही काही अशुद्ध रुपे योजल्याने भाषेची खुमारी, गोडवा अधिक वाढतो (जसे आमरसात कणभर मीठ घातल्याने त्याची चव वृद्धींगत होते) तर मग तुम्ही याला काय प्रतिवाद करणार ? 'आम्ही करतो त्या चुका ग्राह्य, आणि तुम्ही करता त्या चुका त्याज्य' असे म्हणणार ?

भाषेत चुकीचे प्रयोग असतील तर ते चुकीचेच आहेत असे म्हटले पाहीजे. भाषा शुद्ध करायची असेल तर ती संपूर्णपणेच शुद्ध केली पाहीजे, selectively नव्हे, याबद्दल कोणाही विचारशील माणसाचे दुमत असेल असे वाटत नाही!  

जाता जाता, तुम्ही पुरुषरुप धारण करुन आलेली कुमारीका अथवा गृहिणी आहात, अगर पुरुषरुप धारण करुन आलेले कुमार/युवक/गृहस्थ ई.ई. आहात, किंवा इतर काही, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. आपणही आपली चौकस बुद्धी लेखकाच्या identity बद्दल उचापती करण्यापेक्षा त्याच्या विचारांचा प्रतिवाद करण्याकरता वापरली तर बरे होईल!

ता.क. आपल्या लिखाणातील 'कल्पुन' हा अशुद्ध शब्द वाचून माझ्या मस्तकात एक जवळजवळ जीवघेणी कळ आली हे नमूद करतो.