सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी साधारण ह्याच प्रश्नाला स्पर्श करणारी एक कथा नवल मासिकात आलेली होती. आता सगळी आठवत नाही. मात्र चिरतरुण राहणाऱ्या आईवडिलांना आपला मुलगा जख्ख म्हातारा होऊन मृत्युशय्येवर खितपत पडलेला पाहायची वेळ येते अशी काहीशी ती गोष्ट होती.