रोहिणी, ही माहिती तर छानच आहे पण त्याशिवाय मी अनेक चर्चमध्ये 'मदर्स डे आउट' असे काही उपक्रम पाहिले आहेत. कदाचित तुम्हालाही ही माहिती असेल. मुलांना सांभाळणाऱ्या मातांना थोडा बदल / विरंगुळा म्हणून हे उपक्रम असतात. बहुधा ते अगदी नावापुरते किरकोर किंमत आकारून अंमलात आणले जातात. कधी फुकट असतात. चर्चने पुरस्कृत केलेल्या या उपक्रमात त्या वेळात मुलांची देखभाल करण्याकरता कायद्याने संमती असलेली आया, खेळणी आणि पाळणाघरासारखे वातावरण असलेली खोली असते .
(दोन्ही मुलांना तिथे कधी ठेवले नाही त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव नाही, माहिती ऐकीव आणि फलके/पाट्या पाहूनच आहे)
सोनाली