असे अनुभव अनेकांना येतात खरे. पण ते खरे आहेत की खोटे ते आपण ठरवू शकत नाही. आपल्याला स्वतःला असाच काही अनुभव आला आणि इतरांना कुणाला आला नाही तर त्यांच्यामते ते सत्य नाही असे होईल अन् आपल्या मते ते स्वानुभवावर आधारलेले असल्यामुळे सत्य असेल. म्हणून असे अनुभव हे सापेक्ष असतात. प्रत्येकाला तसा अनुभव यावा हे गरजेचे नाही.
जसे परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ह्यावर आस्तिक अन् नास्तिक यांचे वाद होताना दिसतात. ज्या ज्या नास्तिकांना परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव आला त्यातील बऱ्याच जणांनी नंतर परमेश्वर आहे याचाच पुरस्कार केला. याउलट देखील आहे. आस्तिकही नास्तिकतेकडे वळल्याची उदाहरणे आहेत.
त्यामुळे हे अनुभव ज्याचे त्याला यायचे असतात अन् ज्याचा त्याने याबद्दल निर्णय घ्यायचा असतो. कुणी वाईट वाटून घेवू नये, पण एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आला नाही म्हणून तो खरा असेलच अथवा नाही यावर खल करणे निरर्थक आहे असे मला वाटते.