तसे म्हटले तर अध्यात्म सुद्धा एखाद्या वस्तुचे प्रयोजन विश्लेषण करून सांगू शकत नाही. हा संसार ही माया आहे आणि जे काही चाललेले आहे ते केवळ भगवंताची इच्छा... असेच त्यातून शेवटी उत्तर निघते अन् याहून जास्त जर काही निघत असेल तर अध्यात्मिक पातळीवर अनुभव घेतलेला व्यक्ती त्याबद्दल बोलू शकत नाही. कारण श्रीरामकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान हे अजूनपर्यंत उष्टे झालेले नाही (अर्थात कुणीही त्याचा परिपूर्ण अर्थ सांगू शकलेला नाही, त्यासाठी कोणत्याही भाषेत पुरेसे शब्दच उपलब्ध नाहीत).
   तुलना करायची म्हटले तर विज्ञान अन् अध्यात्म यांची तुलना होवू शकत नाही यामताशी मी सहमत आहे. विज्ञान हे भौतिक गोष्टींबद्दल थोड्याफार प्रमाणात काही सांगू शकते. त्यासाठीच त्याचे प्रयोजन आहे. अध्यात्मात सर्व कुतुहल हे भगवंताच्या चरणाशी वाहिलेले असते. त्यामुळे या दोघांची तुलना होवू शकत नाही. अर्थात् निमिष म्हणतात तसे त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे आहे.