मित्र प्रवासी,
हा साधा आणि गूढ दोन्ही अर्थ माझे नसून त्या गोसाव्याने डॉ. वाकोडेंना सांगितले आहेत. पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे असावे-
तुम्ही म्हणालात तसे हे 'तू' आणि 'मी' दोघांनाही लागू पडते. पण मी आधी मेलो आहे आणि मला आता ज्ञान झाले आहे ते मी तुला सांगतो आहे (मी गोसावी झालो आहे?). तुला-मला संसाराच्या मायाजालात अडकवून तो वरून मजा बघतो आहे. तू जर अज्ञानात माझ्या आकर्षणामुळे मेलीस तर पुन्हा वर उभा असलेला तो तुझे असेच हाल करेल. मी तुला त्याची आठवण करून देतो. त्याला ओळख.
असे काहीसे असावे.
आपल्या मराठीत सुद्धा गूढ भारूड आहेत. "काट्याच्या अणीवर वसले तीन गाव" सारखी गुढगीते आहेत. त्यातील अर्थसौंदर्य कुणी उलगडून दाखवले तर मजा येईल.