नाटकांची तिकीटे जास्त असतात खरी, पण चित्रपटांपेक्षा त्यांचे खर्चही जास्त असणार. नटसंच, तांत्रिक मदतनीस संच इथून तिथे नेणे, त्यांचे नखरे/आजारपणे/मालिकांत जाणे याला तोंड देणे इ.इ. चित्रपटाचे एक रिळ एकदा वितरकांकडून विकत घेतले की नंतरचा खर्च जास्त नसावा. कलाकारांना प्रत्यक्ष अभिनय करताना पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. नीट चौकशी करुन/परीक्षणे वाचून चांगली नाटके पाहिली तर पैसे नक्कीच वसूल आहेत. फक्त 'मराठी बाणा'  या नाटकाचे ३०० रु प्रत्येकी हे तिकीट मला परवडणार नाही.जास्त म्हणजे किती आणि आपल्याला काय आवडते हे पाहून नाटक पहायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.