द्वारकानाथ कलंत्री, सेमी इंग्लिशची पद्धत खरंच चांगली आहे. महेश यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आठवीत सुरुवातीला थोडा त्रास होतो. सगळंच डोक्यावरून जातंय असं वाटतं! (घरी इंग्रजी वृत्तपत्र असेल आणि इंग्रजी वाचनाची थोडी तरी सवय असेल तर तो त्रास देखील होत नाही) नववीच्या वर्षात सगळं सुरळीत चालू होतं. नाहीतरी अकरावी बारावीला विज्ञान शाखेत इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नसतोच मग त्याची सुरुवात आठवीतच का करू नये? ज्यांचं आठवीत सेमी इंग्लिश नसतं त्यांना पुढे अकरावीत माध्यम बदलावं लागतंच ना! उलट शासनाने आठवीत सर्वच तुकड्यांसाठी सेमी इंग्लिश सुरू करावं असं मी म्हणेन.
यात मराठीचे शिरकाण वगैरे तर मुळीच होत नाही. उलट महेश यांच्याप्रमाणे नवनवे शब्द, रचना शिकल्याने मराठीवर चांगलाच परिणाम होतो असे मला वाटते. पूर्ण इंग्रजी किंवा पूर्ण मराठीपेक्षा हा मधला पर्याय खरंच चांगला आहे.
-सौरभ.