मला स्वतःला ह्याचा अनुभव नाही कारण माझे अकरावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे व मुलांचे शालेय शिक्षण महाराष्ट्राबाहेर झाल्याने ते इंग्रजीतून झाले आहे. पण विचार केला असता ही सेमी इंग्लिश पद्धत म्हणजे 'मध्यममार्ग' आहे आणि त्याचा निश्चितच उपयोग होईल असे वाटते. एकदम मराठीतून इंग्रजीत न जाता हळूहळू इंग्रजीशी जुळवून घेणे बरे पडेल असे वाटते.