हे शब्द तमिळ आहेत (चू भू द्या घ्या)

मुरुक्कू (मुरुकू) म्हणजे तांदुळाच्या पिठाची चकली (पण सोऱ्याचे छिद्र लहान असलेली). तेंगूळ (टेंगूल) म्हणजे त्याच पिठाची बारीक नळीची कडबोळी. भाजणीच्या चकलीची आणि कडबोळ्यांची सवय असणाऱ्यांना हे दोन्ही प्रकार पंडुरोगी भासतील.

अवांतरः आपण चटकमटक म्हणतो तसे तमिळ लोक कुरुकूमुरुकू म्हणतात. टेंगूल हे केरळमध्येही प्रचलित आहे.