मनवेल्‍हाळ कान्‍हा,त्‍याची वेळी-अवेळी घुमणारी बासरी,त्‍याच्‍याकडे ओढ घेणारे नाठाळ मन,जाणारी वाटही ओढाळ,
अवघड,धावणारी पावले रक्‍तबंबाळ,डोळे वेदनेने भरून आलेले,म्‍हणून बोझल,अशा विव्‍हल राधेवर बरसलेला करुणेचा
मेघ..घनश्‍याम..डोळ्‍यांचे भरलेपण व्‍यक्‍त करायला बोझल इतका समर्पक शब्‍द,दुसरा नाहीच सुचला...सुषमा