मराठीला शेवटी "राजभाषे"चा दर्जा मिळतो आहे, ही खरच आनंदाची बाब आहे. पण आपण शुद्ध  आणि नियमबद्ध मराठी वापराकडे कितपत लक्श देणार आहोत? की "पिन्याचे पानी", "आनी", "आर्शिवाद" अशाच शब्दांचा वापर करणार आहोत? अचूक मराठी लिहिण्याकडे आणि बोलण्याकडे लक्श देणे हेही तितकेच महत्त्वाचे नाही का? "प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर 'येणारी' 'आगामी' लोकल....." हे असलं मऱाठीच ऐकावं आणि वाचावं लागणार असेल, तर आगीतून सुटून फुफाट्यात पडल्यासारखं होईल.