या उद्दिष्टांसाठी काम करीत असलेल्या 'मराठी अभ्यास परिषदेच्या' संकेतस्थळाचे काल मंगल महाराष्ट्रदिनी उद्घाटन झाले. सन्माननीय मनोगत सदस्य श्री. चित्त यांनी या संकेतस्थळाची रचना केलेली आहे.

संकेतस्थळाचा दुवा: दुवा क्र. १

आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते!

परिषदेतर्फे 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' त्रैमासिक १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित होते. ह्या नियतकालिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झाला आहे. मराठी ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेले हे त्रैमासिक भाषेला वाहिलेले एकमेव नियतकालिक आहे.

भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य यासोबतच अनेक चुरचुरीत सदरे मासिकात वाचायला मिळतात.

संकेतस्थळाच्या माध्यमातून मासिकात पूर्वप्रसिद्धी मिळालेले काही निवडक लेख पुनर्प्रकाशित करण्यात येतील.

या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आपल्या मित्रमंडळींनाही अवश्य सांगावे. काही सूचना, प्रतिक्रिया, अभिप्राय असल्यास अवश्य कळवावेत. ही विनंती.