मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्या
तृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलो

छान

सरला वसंत, उरले काटे उरात बाकी
तेव्हा फुलारण्याची मी यातना समजलो...

वा...वा...


झाले असह्य जेव्हा, मिटलेस फक्त डोळे
मिटण्यासही तुझ्या त्या मी वासना समजलो

क्या बात है !

समजून हेम धरले छातीस हीन कथला
लक्ष्मीस मी गुणांच्या निष्कांचना समजलो

हेम, हीन आणि निष्कांचना...सुंदर !!! सुंदर !!!


धरती क्षमाशिला अन्‌ अपराध पावसाचे
परमेश्वरी कृपेची ही योजना समजलो

ही क्षमाशिला  धरतीही आवडली...!

सरला वसंत, उरले काटे उरात बाकी
तेव्हा फुलारण्याची मी यातना समजलो...


छान...

........

साजेसे चित्र...साजेशी गझल. कोंबडी आधी की अंडे, या सनातन प्रश्नाप्रमाणेच आधी चित्र की आधी गझल, असा प्रश्न पडावा :)  एकंदर छान गझल...(आणि चित्रही हां...!) शुभेच्छा मिलिंदराव !