मी आधी च्या चौकशीबद्दल एकाच वाक्यात म्हंटले आहे की "आम्हाला सांगीतले ते दाखवले नाही...." (बिना चौकशी कुणीच ३५००० रुपये माणशी भरत नाही...)

बरेवाईट अनुभव सगळ्यांनाच येतात. मला आला असता तर मी त्या कंपनीच्या हेड ऑफिसला रीतसर तक्रार करून, (सगळ्या गोष्टींची, नाव, तारीख सकट) त्यांना ग्राहक पंचायत, वकील वगैरे तम्बी देऊन भरपाई मागितली असती (दूसरी टूर तरी). पेपरलाही दिलं असतं छापायाला. तुम्ही केलत का असं काही? एकदा लढायचं तर शेवटपर्यन्त..(पुस्तकी नव्हे बरं का हे..)    

तक्रार करणे पेपर ला देणे हे सगळे आम्ही करून झाले आहे..... पण मी ना कुठल्या सिनेतारकाची मुलगी आहे ना क्रिकेटपटुची की माझा अनुभव ग्राह्य धरला जाइल..... पेपर वाले कशाला छापतील??? त्यांना १ पान जाहिरात मिळते त्यांच्याकडुन.... आणि ग्राहक पंचायत ह्या ठिकाणी माझ्या सासय्रांनी ४ वर्षे एक केस लढवली आहे,.,,,, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि पैसा फुकट घालवायची माझी इच्छा नाही..... लढायचं तर शेवटपर्यंत वगैरे पुस्तकात शोभतं आजच्या जगात असल्या फालतू गोष्टींसाठी लढायला माझ्याकडे वेळ नाही....जसे मी सांगीतले "आमच्या अनुभवातून इतरांनी कोणत्याही टुर कंपनीचे बुकिंग करताना असे अनुभव येउ नयेत ह्याची खबरदारी घ्यावी आणि माझी लिखाणाची हौस पूर्ण व्हावी एवढीच माझी अपेक्षा होती...."

कांगावा मी मुळीच करत नाहीये मिस्टर.... मी तर वारंवार सभ्यपणे हेच सांगते आहे की हा माझा अनुभव आहे.... त्यावरून ज्यांना शहाणे व्हायचे आहे त्यांनी व्हा

(व्यक्तिगत रोख आणि विषयांतर वाटलेला मजकूर वगळलेला आहे : प्रशासक)