लेख छान आहे. पण तुम्ही हटके लिहिण्यासाठीचा विषय म्हणून ज्या 'चालणार लंगडा' या कवितेचे हे उदाहरण दिले आहे, ती कवीता मला तरी मुळीच वाईट वाटत नाही, म्हणजे मुद्दाम काहितरी हटके लिहायचे म्हणून ती लिहिलेली आहे असे तरी वाटत नाही. ती भले 'विनोदा'च्या मार्गाने जाणारी असे वाटत असेल तरी ती छानच आहे आणि एक असेही वाटते की त्यात एक कारूण्याची झालर आहे, त्या दृष्टीकोनातून सुद्धा ती छानच वाटते.

उलट छापील मासिके, वर्तमानपत्रे यातील कवितांपेक्षा आजकाल ब्लॉग्ज वरील कविता कित्यक पटीने सरस असतात असे मला वाटते.