सहमत आहे आणि अजून एक मुद्दा :

जसे वृद्ध मंडळी म्हणत असतात की : "अश्लील चित्रपट सतत पाहिल्याने युवकांवर वाईट परिणाम होतो." आणि " "गुन्हेगारांना गुन्ह्याचे प्रशिक्षण बरेचदा चित्रपटांतून मिळते."

याच न्यायाने असे म्हणूया की : " सतत एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या 'सासू-सून-नणंद-जावा-भावजयी' ( कधी कधी एकमेकांना मारण्यासाठी हाई बंदूक सुरा सुद्धा घेणाऱ्या ) ज्या मालिकांमधून सतत दाखवल्या जातात, ते बघून नक्की गृहीणींवर बाईट परिणाम होतोच. सुशिक्षीत असोत नाहितर अशिक्षीत. या मालिकांत एकमेकांना मारून टाकण्यासाठी, जायबंदी करण्यासाठी अनेक उपाय महिलांना सुचवले जातात." जे पुरुष कंटाळून या मालिका बघत नाहीत त्यांनी सलग काही भाग नाईलाजाने पाहावेत म्हणजे काय काय चालतं या मालिकांमध्ये, ते समजेल!

आपल्याला काय वाटते?