अरे निखल्या, त्या पेटीला मी माझे कुलूप घातलंय ना? त्यावरच तू तुझ्या हापिसातलं एक कुलूप घाल.
त्या कुलुपाची किल्ली तुझ्याजवळच ठेव.
मग त्या दोन्ही कुलुपांसकट ती पेटी बसने माझ्याकडे परत पाठव.
मी माझ्या किल्लीने माझं कुलुप काढून घेते आणि तुझ्या कुलुपासकट बंद पेटी बसने परत पाठवते.
ती घेऊन तू तुझ्या किल्लीने तुझे कुलुप उघड आणि आतलं सामान काढून घे!
हाय काय अन नाय काय!