कुलुप बंद करताना किल्ली न लागणारी कुलपे असतात, नुसते दाबून कुलुप लागते, पण उघडताना मात्र किल्ली लागते. असे एक कुलुप निखिलने घरी पाठवायचे (न लावता) किल्ली स्वतःकडेच ठेवायची. वृषाली मग त्या कुलपाने एक पेटी बंद करून पाठवेल. निखिल मग आपल्या चावीने कुलुप उघडेल. कुलुपाची किल्ली कायम निखिलकडे सुरक्षित राहील.