...  'विलंबित' प्रतिसादाबद्दल क्षमस्व !  शुभेच्छा आणि कौतुकाबद्दल मनापासून आभार.

कृपया खालीलप्रमाणे बदल कसा वाटतो पहावे.

"कसे म्हणू की एकदाही, भेटलीस मज तू नाही
 आलीस ही,म्हटलेस 'नाही',त्यात मी संतुष्ट आहे!"


थोडं "पाहू कोणा कष्ट आहे" विषयी :

सुहृदास कुठल्याही प्रस्तावनेशिवाय एकमेकांच्या व्यथांना अश्रूंची नि:शब्द वाचा देण्याचं हे आमंत्रण आहे.

मन हलकं झाल्यावर, निरभ्र डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत सावकाश ठरवूत की नक्की कोणाला काय दु:ख-कष्ट आहेत...


शब्दयोजने किंवा रचनेमुळे काही वेगळा अर्थ ध्वनित होऊ शकेल, याची कल्पना आहे. पण त्यातच गझलेची मजा असावी कदाचित !