जगातल्या श्रीमंताच्या यादित पहिल्या १० मधे ४ भारतीय असण्याचा कि दरडोई उत्पन्नात जागतिक क्रमवारीत १२० च्या खाली क्रमांक असण्याचा अभिमान?

वर दिलेल्या यादीत शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, शाहरूख खान ही नाव वाचून तर धन्यच झालो.

हे खर जहिरात युग. सत्य परिस्थिती कडे डोळेझाक करून वरवर दिपवणाऱ्या सुबत्तेने भुलून जाण्याची किमया! जोवर या आर्थिक सुबत्तेची किल्ली मुठभरांच्याच हाती आहे आणि धान्य पिकवणारा आमचा बाप फासाला लटकत आहे तोवर कशाचा अभिमान? तोवर ह्या साऱ्याची लाजच वाटली पाहिजे. टाटा ने १ लाखाची मोटार काढल्याचा अभिमान ठेवायचा कि सिंगुर मधे त्यांच्या प्रकल्पावर जनतेच्या मनाविरुद्ध त्यांना तिथून हुसकावून लावताना झालेल्या आत्याचारान पेटून उठल पाहिजे? अन असच बरच काहि...

- एक भारतीय
(ज्याला जागतिकीकरणाच्या लाटेत आलेल्या आर्थिक सुबत्तेची अनेकदा लाज वाटते)