आंतरराष्ट्रीय स्तरावर यश आणि प्रसिद्धी मिळवलेल्या भारतीयांचा निश्चितच अभिमान वाटतो. अगदी शाहरुख आणि शिल्पा शेट्टीचा देखील. फॉर दॅट मॅटर... गोऱ्यांच्या देशात पाय रोवून असणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाटतो. टाटा उद्योगसमूहानी लाखाची गाडी काढण्याव्यतिरिक्त अनेक चांगली कामं केली आहेत ह्याबद्दल खात्री आहे. एरवी माझ्या वरील अनुभवकथनातील "सत्य परिस्थिती कडे डोळेझाक करून वरवर दिपवणाऱ्या सुबत्तेने भुलून जाण्याची किमया! " ह्या मधली सत्य परिस्थिती अशी आहे की ३ वर्षांपूर्वी मला जो अनुभव आला होता त्याच्या अगदी विपरीत आणि चांगला अनुभव मला ह्या वर्षी आला. ही किमया मी उल्लेख केलेल्या लोकांमुळे साधली आहे असं माझं म्हणणं आहे. लोकांनी मला काही वर्षांपूर्वी ' तू हत्तीवरून कॉलेजात जातोस का?' असं विचारल्याचं आठवतं. हे गैरसमज विलयाला गेल्याचा आणि ज्यांनी आमच्यावर १५० वर्षं राज्य करून आम्हाला रसातळाला नेलं त्यांना "तू हे काम केलं नाहीस तर तुला तुझं कमिशन मिळणार नाही" असं ऐकवताना जे वाटलं ते शब्दात सांगता येणारं नाही. आणि ह्याला केवळ "जाहीरात युग" नक्कीच जबाबदार नाही.

ऐश्वर्या, शाहरुख आणि शिल्पा शेट्टीबद्दलचा तुमचा आकस माझ्या आकलनापलिकडचा आहे. तुमची "ह्या प्रसंगाबद्दलची ही प्रतिक्रिया" हा वड्याचं तेल वांग्यावर घालण्याचा प्रकार वाटतो. तुमचं मत पटलं नाही.