आम्हाला सामान्यशास्त्रात सातवीत पुनरुत्पत्ती हे प्रकरण पहिल्यांदा होते. नंतर हळू हळू त्यचा परिचय झाला. परागीभवन, फलधारणा वगैरे शिकत नंतर हळू हळू स्मजायला लागले. वेगळे लैंगिक शिक्षण नव्हते. आमची फक्त मुलांची शाळा होती. मुलामुलींचे एकत्र वर्ग असताना हे कसे शिकवायचे माहीत नाही.

कॉलेजात उंदराचे शरीर शिकवताना बाईंनी पुनुरुत्पत्ती अतिश्य चांगली शिकवली. तरी तिथे मुलामुलींचे एकत्र वर्ग असल्याने काही मुलांना त्या तासाला लाजल्यासारखे होत असे.

असो. औपचारिक लैंगिक शिक्षण नसूनही माझ्या आयुष्यावर, व्यक्तिमत्त्वावर त्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही.