या विषयावर सरकारचे धोरण धरसोडीचे आहे  अजूनही लैंगिक शिक्षण देण्याचा निर्णय ठामपणे अंमलात आणला जाईल की नाही याविषयी शंकाच आहे. दूरदर्शनवर एका प्रसूतितज्ञ डॉक्टरानी त्यांचा अनुभव सांगितला.त्यात एक मुलगी त्यांच्याकडे घाबरत आली आणि मला दिवस गेलेत अशी भीती वाटते असे म्हणाली.प्रत्यक्षात तसा काहीच प्रकार नव्हता.लैंगिक शिक्षण तिला मिळाले असते तर असे घडले नसते.  तिच्या या अज्ञानाचा गैरफायदाही घेतला जाण्याची शक्यता असते. असाच प्रकार मुलाच्याही बाबतीत घडू शकतो̮. लैंगिक शिक्षणावाचून मागील पिढीचे अडले नाही असे म्हणण्यात काही तथ्य नाही,कारण कुणाचे काही अडले असले तरी तसे उघड करण्याचे धैर्य सर्वांकडे नसते.