या विषयाचा आवाका केवळ विज्ञान शाखेस जाणाऱ्या विद्याथ्यांपुरता मर्यादित आहे. जे विद्यार्थी कला किंवा वाणिज्य शाखेस जाणार असतील त्यांना पुढे हे दोन्ही विषय शिकायचे नसतात. विज्ञान शाखेस जाण्याचा निर्णय आठवीपासूनच घेतला जातो का?
                      विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही कोणत्याही विषयाचे आकलन मातृभाषेतच अधिक चांगल्या प्रकारे होते. नंतर महाविद्यालयात फक्त तेच ज्ञान माध्यम बदलून घेणे फार अवघड जात नाही. याचा मला स्वतः ला अनुभव आहे.