मुळात तुमचा लेख हा ‘दुसरे देश आपल्याला मान्यता देत आहेत’ म्हणुन आता अभिमानने आपली छाती फुगली पाहिजे असा एक संदेश देतो. माझ म्हणन इतकच दुसर्‍यांची मान्यता ही काय गौरवाची बाब असु शकते का? म्हणजे त्यातही पुन्हा आपण गोर्‍यांचच श्रेष्ठत्व सिध्द नाही का करत? ते आज आपल्याला मानतात म्हणजे काय आपण लई भारी झालो का? 

मुळात स्वातंत्र्यासाठी इतका आटापिटा का केला? स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता याचसाठी ना? मग ह्यातल काय मिळवल आपण? गेल्या ३ वर्षांत झालेल्या बदलांबद्दल तुम्ही बोलताय. एक आर्थिक महासत्ता म्हणुन आपला उदय होतोय हे मान्य. जगात आता (एक बाजारपेठ म्हणुन का होइना) आपली दखल घेतली जाते. मग याचा परिणाम लोकांच जीवनमान उंचवायला व्हायला हवा होता कि नाही? तस झाल का? इथल्या सामान्य माणसाच्या कपाळात ह्या जागतिकीकरणान काय मारल? यापुर्वी शेतकर्‍यांच्या इतक्या आत्म्हत्या कधी झाल्या होत्या का? काही महानगर, शहर सोडली तर भारत आजही गारुड्यांचाच देश वाटावा इतकी भयाण स्थिती आहे. मग या आर्थिक भरभराटीचा उपयोग काय? तंत्रज्ञातील प्रगतीने सामान्य माणसाचे कोणते प्रश्न सोडवले? उलट ह्या आर्थिक भरभराटीन एक मानवनिर्मित सुनामीच तयार झाला आहे, जो महानगरांतुन सामान्य माणसाच समुळ उच्चाटन करतोय. जी प्रगती सर्वसमावेशक नाही, जी समाजात विषमतेची इतकी मोठी दरी निर्माण करत चालली आहे, तिने लाजच वाटली पाहिजे. जोपर्यंत आपल्या सामान्य देशबांधवांना आपण माणसांच जगन देउ शकत नाही, तोपर्यंत जगात तुम्हाला आता किती मान आहे ह्या गप्पा फोलच!

> अगदी शाहरुख आणि शिल्पा शेट्टीचा देखील. फॉर दॅट मॅटर... गोऱ्यांच्या देशात पाय रोवून असणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाटतो.
आता शिल्पाने ‘बिग ब्रदर’ जिंकली. एका मुर्ख गोर्‍या बाईने तिच्यावर वांशिक टिप्पणी केली, मग ही रडली, मग इथल्या मंत्र्यांनीही जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली. असल्या थिल्लरपणामुळे तुमचा देशाभिमान वाढला असेल तर मी काय बोलणार! गोर्‍यांच्या देशात पाय रोवुन असणारे भारतीय त्यांच्या वैयक्तीक फायद्यासाठी तिथे पाय रोवुन आहेत, मग त्यांचा असा काय अभिमान वाटला पाहिजे कळत नाही?

> ऐश्वर्या, शाहरुख आणि शिल्पा शेट्टीबद्दलचा तुमचा आकस माझ्या आकलनापलिकडचा आहे.
आता तुम्ही यांचा इतका गौरवपुर्ण का उल्लेख केला हेही कळत नाही. ह्यांचा कुठला सिनेमा जगतिक पातळीवर दखल घेण्याजोगा प्रगल्भ होता हे काही स्मरत नाही.