या कोड्यातील संबंधित शोधसूत्र असं आहे -
मुली, तू प्रशंसेत गुरफटलीस की ओझे अंगावर बाळगण्याचा आदेश मिळतो.
त्याचं कोड्यातलं उत्तर वागवा असं आहे. शोधसूत्राच्या पहिल्या भागात मुलीच्या प्रशंसेचा मुद्दा आहे. त्यानुसार 'वागं वा' असा अर्थ होतो. उत्तरार्धानुसार वागवा असं हवंय. म्हणजे शोधसूत्रातील दोन सूत्रे परस्परविसंगत ठरतात.
पडाव यासंदर्भातही तसेच होते आहे.
शोधसूत्र या संकल्पनेविषयी मीराताईंनी जे लिहिलं आहे त्याच्याशी सहमत आहे. पण शोधसूत्रे परस्परविसंगत असणं चालेल का? माझ्या मते नाही.